Home देश-विदेश काबूलमधील रशियन दूतावासाजवळ आत्मघातकी हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू

काबूलमधील रशियन दूतावासाजवळ आत्मघातकी हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू

0 second read
0
0
113

no images were found

काबूलमधील रशियन दूतावासाजवळ आत्मघातकी हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू

काबुल:  युक्रेनमधील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. तर अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रशियन दूतावासावर आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आला आहे. यामध्ये 2 अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून काबूल सतत धगधगत आहे. तिथे खूप जास्त तणाव आहे. पुन्हा एकदा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे.  अफगाणिस्तानमधील काबूल इथल्या रशियन दूतावासाबाहेर हा आत्मघातकी हल्ला झाला.रशियन दूतावासाच्या प्रवेशद्वाराजवळ हल्लेखोरांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला आधिच ओळखलं होतं. त्यांनी गोळी देखील चालवली. मात्र हल्लेखोर दूतावासाजवळ पोहोचण्यात यशस्वी झाला.जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यामागचं कारण अजून समोर आलं नाही.

एक वर्षापूर्वी तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर काबूलमधील आपला दूतावास कायम ठेवणाऱ्या काही देशांपैकी रशिया आहे. मॉस्को अधिकृतपणे तालिबान सरकारला मान्यता देत नसले तरी ते पेट्रोल आणि इतर वस्तूंचा पुरवठा  करण्यासाठी करार घडून आणण्याकरिता याठिकाणी चर्चा सुरु आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…