
no images were found
एचक्यू प्रीमियम स्टेशनरीतर्फे गांधी जयंतीच्या औचित्याने खास खादी कव्हर जर्नल्स सादर
नवनीत एज्युकेशनच्या एचक्यू या प्रीमियम स्टेशनरी ब्रँडतर्फे गांधी जयंतीच्या औचित्याने खास ‘खादी‘ जर्नल सीरिज सादर केली.
खादीच्या कापडाला भारतात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. खादीचे कापड हाताने विणले जाते आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीमध्ये महात्मा गांधींनी खादीचे कापड लोकप्रिय केले. महात्मा गांधींनी परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी खादीच्या प्रसार केला. भारतात तयार करण्यात आलेली उत्पादने वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेल्या स्वदेशी चळवळीचा खादीच्या वापरावर भर होता.
खादी हा भारतीय इतिहास व संस्कृतीच्या अभिमानाचा पैलू आहे. खादीचा वापर म्हणजे स्थानिक कारागीर व शाश्वततेला पाठिंबा असे समीकरण आहे. हे केवळ एक कापड नाही तर भारताची सांस्कृतिक ओळख आणि वारशाचा एक अविभाज्य घटक आहे. आजही खादी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. केवळ कपडेच नव्हे तर होम फर्निशिंग, ॲक्सेसरीज आणि आता पहिल्यांदाच जर्नलच्या कव्हरसाठीही याचा वापर होणार आहे!
खादीचा कपड्यांव्यतिरिक्त कुठे वापर केला जाऊ शकतो, याचे ही एचक्यूची जर्नल्स हे एक उत्तम उदाहरण आहे. या जर्नल्समध्ये ८० जीएसएमचा नॅचरल शेड असलेला कागद आहे. बहुतेक भारतीय याच कागदाचा वापर करतात. खादीचे कापड एका जाड, मजबूत, कठीण आवरणाला चिकटवले आहे. त्यामुळे तुम्हाला लिहिताना एक व्यवस्थित आधार मिळतो. हे जर्नल खादीच्या ४ सुंदर रंगांमध्ये आणि A5 आकारात असून या जर्नलमध्ये १९२ पाने आहेत.
नवनीतमधील डोमेस्टिक स्टेशनरी डिव्हिजनचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणतात, “नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्याने आम्ही इतके सहज आणि तितकेच बहुमोल उत्पादन तयार करू शकलो. हे उत्पादन म्हणजे भारताचा समृद्ध वारसा व संस्कृतीला दिलेली मानवंदना आहे.”
जेव्हा तुम्ही या जर्नलमध्ये लिहू लागाल तेव्हा तुमच्या लेखणीची धार वाढलेली तुम्हाला नक्कीच जाणवेल.
—