Home मनोरंजन मा. सुधीर मुनगंटीवार आणि आ. बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते “अंकुश” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मा. सुधीर मुनगंटीवार आणि आ. बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते “अंकुश” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

8 second read
0
0
102

no images were found

मा. सुधीर मुनगंटीवार आणि आ. बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते “अंकुश” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

 

 

      बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते श्री. राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला अंकुश हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे लाँच करण्यात आला.राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या “अंकुश” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरत आहे.
     ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे . मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीतकार आहेत, हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे,क्षितिज पटवर्धन, समृद्धि पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन, कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत. चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले. सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे,शशांक शेंडे,गौरव मोरे, नागेश भोसले ,पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट आहे.
      सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार अंकुश या चित्रपटात आहे. म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून अंकुश या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच धडाकेबाज अॅक्शनचं दर्शन घडत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरचं लोभस दिसणंही चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुरेपूर मनोरंजनाचा आनंद देणारा “अंकुश” हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना केवळ ६ ऑक्टोबरची प्रतीक्षा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …