no images were found
तंत्रज्ञान अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अभियांत्रिकी दिन साजरा
भारताचे महान इंजिनिअर भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, इंडियन सोसायटी फॉर हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE), रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सर्व्हिसिन्ग सेक्टर सोसायटी (RASSS) आणि इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे श्री. सि. एल. कोळी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळ (MSETCL), कराड आणि सन्माननीय अतिथी श्री. जियाअहमद मोमीन, उद्योजक, यामा कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर हे या व्याख्यानासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी अभियंता दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून केली. यानंतर पि. पि. पुंगावकर (राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, RASSS) यांनी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सर्व्हिसिन्ग सेक्टर सोसायटी याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले तसेच श्री. सुरेश पाटील (सचिव, ISHRAE) यांनी आपल्या संस्थेबद्दल माहिती देऊन मेंबर होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सि. एल. कोळी यांनी विज्ञान म्हणजे ज्ञान आत्मसात करणे पण अभियांत्रिकी म्हणजे मिळालेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवणे या वाक्याने भाषणास सुरुवात केली त्याच बरोबर स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये असणाऱ्या संधीबद्दल सांगितले. सन्माननीय अतिथी श्री. जियाअहमद मोमीन यांनी अभियांत्रिकी मधील मुख्य शाखा जोपासाव्या असे विद्यार्थ्यांना संबोधले.
तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. व्ही. एस. पाटील, एस. एम. भोसले, व्ही. के. कांबळे, वाय. एस. व्हटकर, ए. व्ही. रेणावीकर, टी. आर. पाटील, एम. ए. लोखंडे व ए. ए. कुलकर्णी यांनी केले. डॉ. पुनश्री फडणीस यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच तंत्रज्ञान अधिविभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे समन्वयक महेश साळुंखे यांनी आभार मानले.