
no images were found
शिवाजी विद्यापीठाला ‘बार्टी’चे प्रशिक्षण केंद्र मंजूर
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठाला मंजूर झाले असून अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक (IBPS), रेल्वे, एल.आय.सी., व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या निशुल्क पूर्वप्रशिक्षणासाठी १० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. त्यासाठी बार्टीच्या संकेतस्थळावर अर्ज भरणे अनिवार्य आहे याबाबत प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असून याबाबतची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या तसेच बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ०२३१- २६०९३९६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
शिवाजी विद्यापीठ व बार्टी, पुणे यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविण्याबाबत सामंजस्य करार झाला असून त्यानुसार हे केंद्र मंजूर झाले आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या सहकार्याने ही कार्यवाही पूर्ण झाली आहे. अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर
विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात ही संधी उपलब्ध करून देता आली, याचा आनंद आहे, अशी भावना डॉ, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त केली.