
no images were found
नेस्ले इंडिया मिलेट-आधारित उत्पादनांवर देणार अधिक कटाक्षाने भर
मुंबई-ग्राहकांना पदार्थांचे अधिक वैविध्यपूर्ण पर्याय पुरविण्यासाठी नेस्ले इंडिया आपल्या उत्पादनांतील घटक म्हणून मिलेट्स अर्थात भरडधान्यांचा समावेश करत आहे. भरडधान्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या धोरणाशी सुसंगत पाऊल उचलत नेस्ले इंडिया आपल्या सर्व ब्रॅण्ड्ससाठी एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उत्पादनश्रेणी निर्माण करत आहे, जी भागीदारी आणि उत्पादनांतील अभिनव संकल्पनेच्या रूपात भरडधान्यांना एक अधिक शाश्वत अन्नपर्याय म्हणून पुढे आणेल. या उपक्रमाचा भाग म्हणून नेस्ले इंडियाने नेस्ले ए प्लस मसाला मिलेट हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. यात बाजरीचा वापर करण्यात आला असून तो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्याजोगा एक हलकाफुलका पदार्थ असणार आहे.
टॅन्गी टोमॅटो आणि व्हेजी मसाला अशा तोंडाला पाणी आणणा-या दोन स्वादांमध्ये उपलब्ध नेस्ले ए प्लस मसाला मिलेटच्या 240 ग्रॅच्या मल्टी-सर्व्ह पॅकची किंमत रु. 180 असणार आहे, तर 40 ग्रॅमच्या सिंगल-सर्व्ह पॅकची किंमत रु. 30 असणार आहे. या उत्पादमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, कॅलरीजचे प्रमाण 30% कमी आहे आणि ते अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्जपासून मुक्त आहे. हे उत्पादन आयआयएमआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च)च्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले आहे.
भारत हा भरडधान्यांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे, ज्याचा जगभरातील एकूण भरडधान्य उत्पादनामध्ये 20% वाटा आहे. भरडधान्यांवरील प्रक्रिया, त्यांचे आरोग्य आणि पोषणाला असलेले फायदे, भरडधान्यांचे पिक घेण्याच्या शाश्वत व पुननिर्माणक्षम पद्धती, स्टार्ट-अप भागीदारी अशा क्षेत्रांमध्ये सहोयग साधण्याच्या उद्देशाने नेस्ले इंडिया आर अँड डी ने न्यूट्रीहब- आयआयएमआर बरोबर एक सामंजस्य करार केला आहे.
भरडधान्यांचा वेगाने स्वीकार होण्याविषयी आपले मत मांडताना नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुरेश नारायणन म्हणाले, “भरडधान्ये ही भारताच्या कृषीवारशाचा भाग आहेत आणि 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे औचित्य साधून वाढत्या जाणिवजागृतीसह आणि साजेशा उत्पादनांच्या साथीने या धान्यांना पुढे आणणे योग्यच आहे. आमच्या ग्राहकांमध्ये भरडधान्यांसाठी लोकप्रियतेची लाट यावी हे ध्येय समोर ठेवून आमच्या उत्पादनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यासाठी संबंधित उत्पादनश्रेणींमध्ये भरडधान्यांचा समावेश करून घेण्याची आमची महत्वाकांक्षा आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. त्याचा भाग म्हणून नेस्ले ए प्लस मसाला मिलेट बाजारात दाखल करण्यात आले आहे.”