Home शैक्षणिक डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडूनराष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी-डॉ. रजनीश कामत यांचे गौरवोद्गार,

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडूनराष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी-डॉ. रजनीश कामत यांचे गौरवोद्गार,

1 second read
0
0
35

no images were found

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडूनराष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी-डॉ. रजनीश कामत यांचे गौरवोद्गार,

कसबा बावडा/ वार्ताहर
भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती सुरू केली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा सक्षम व्हावा हा दृष्टिकोन ठेवून विद्यापीठाने अंगीकारलेली शिक्षण प्रणाली ही प्रशंसनीय आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असलेली शैक्षणिक वाटचाल डी.वाय. पाटील विद्यापीठाने यापूर्वीच सुरू केली असल्याचे गौरवोद्गार डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी काढले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या स्थापना दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कामत बोलत होते. यावेळी स्त्री शिक्षणासाठी अविरत योगदान देणारे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील याना डॉ. डी. वाय पाटील जीवनगौरव पुरस्कारने गौरविण्यात आले. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, सर्वोत्तम कर्मचारी, सर्वोत्कृष्ट प्राध्यापक आदींचा सत्कार करण्यात आला. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. क्रांतीकुमार पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तत्पूर्वी विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व ध्वजगीत झाले.

डॉ. कामत पुढे म्हणाले, कोणतेही धोरण ठरविणे तुलनेने सोपे असते, मात्र त्याची प्रभावी अमलबजावणी करणे कठीण असते. मात्र कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने हे करून दाखवले आहे. वैद्यकीय, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, फार्मसी, हॉस्पीटलिटी, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट असे बहुशाखीय अभ्यासक्रमाद्वारे या विद्यापीठाने उत्कृष्टपणा जपला आहे. सर्वच पातळीवर उत्कृष्टपणा टिकून ठेवताना तो उंचावण्याकडे संस्थेचा कल आहे. यामुळे या विद्यापीठाने लोकांचा विश्वास संपादन करताना समाजाचे हृदय जिंकले आहे याची साक्ष पटते.

कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांनी विद्यापीठाने गेल्या १७ वर्षात केलेल्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा मांडला. पहिल्या एकशे पन्नासमध्ये विद्यापीठाचा समावेश ही गौरवशाली गोष्ट आहे. विविध विषयावरील संशोधन, विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती आदींची माहिती त्यांनी दिली.

डी. वाय. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार अभिमानास्पद- डॉ. क्रांतीकुमार पाटील
सन्मानाला उत्तर देताना डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी, महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीत अतुलनीय योगदान देणारे पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार मिळत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेमुळे आज लाखो विद्यार्थी घडले त्याचबरोबर हजारो संसार फुलले आहेत. डी.वाय पाटील विद्यापीठाने बहुउद्देशीय विद्यापीठ म्हणून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम स्त्री शिक्षणासाठी ताराराणी विद्यापीठाला देणार असल्याचे त्यानी जाहीर केले.

ताराराणी विद्यापीठाला ११ लाखांचे संगणक: डॉ. संजय डी. पाटील
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ताराराणी विद्यापीठाच्या स्त्री शिक्षणासाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढत संस्थेला संगणकासाठी ११ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर ताराराणी विद्यापीठ खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतर करावे असे सूचित करताना त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. डी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेचा आजवरच्या दैदीप्यमान यशाच्या इतिहासाला उजाळा देत संस्थेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाल्याचे त्यानी सांगितले.

यावेळी मेघराज काकडे, शिवाजी विद्यापिठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव, लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कृषी व तंत्र विद्यापीठचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, प्राचार्य अमृतकुवर रायजादे, प्राचार्य रुधिर बारदेस्कर, प्राचार्य डॉ. जान्हवी शिंदे, डॉ. आर एस पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी, ताराराणी विद्यापिठाचे सचिव प्राजक्त पाटील व कुटुंबीय, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान
यावेळी डॉ. रोमा चोगुले, डॉ वसुधा सावंत, डॉ. राजश्री माने, डॉ. नितीन वाधवानी यांचा बेस्ट टीचर अवार्डने, संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सुभाष पाटील, रावसाहेब धुमाळ, शरद बिरांजे, जगतसिंग रजपूत यांचा बेस्ट एम्लोई अवार्डने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर शैक्षणिक, क्रीडासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ७१ विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …