Home शासकीय जिल्ह्यात 5 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 5 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

19 second read
0
0
40

no images were found

जिल्ह्यात 5 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

 

कोल्हापूर : जिल्ह्यात श्री क्षेत्र जोतिबा देवाची श्रावणषष्ठी व चोपडाईदेवी यात्रा  तसेच उरुस, सण इ. साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. आंदोलन करण्यात येत असून या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 5 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजाविण्या संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पेालीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादींना लागू असणार नाही.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …