
no images were found
लोकशाही दिनात 22 अर्ज प्राप्त
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 22 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनात जिल्हा पुर्नवसन कार्यालय-1, नगर प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय -1, तहसिलदार कार्यालय कागल-1, तहसिलदार कार्यालय पन्हाळा -3, जिल्हाधिकारी कार्यालय महसूल शाखा – 1, गौण खनिज जिल्हाधिकारी कार्यालय -2, तहसिलदार सर्वसाधारण, जिल्हाधिकारी कार्यालय – 1, तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय -1, तहसिलदार करवीर -3, जिल्हा भूमी अभिलेख – 1, जिल्हा निबंधक सह. संस्था – 1 , जिल्हा परिषद कोल्हापूर -2 , जिल्हा अग्रणी बँक -1, जिल्हा पोलीस अधीक्षक -1, सहा. धर्मादाय आयुक्त -1, जिल्हा कृषी अधीक्षक -1 असे एकूण 22 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी दिली.