Home शासकीय मंडळांनी  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन  अर्ज करावेत

मंडळांनी  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन  अर्ज करावेत

12 second read
0
0
23

no images were found

मंडळांनी  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन  अर्ज करावेत

 

 

कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याmahotsav.plda@gmail.comया ईमेल वर दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाखाली नियुक्त समिती गणेशोत्सव काळात भेट देईल. समितीला मंडळांनी आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडिओग्राफी भेटीवेळी सादर करावेत. स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरुन राज्यस्तरावर निवड होणा-या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरीत करण्यात येईल.

यात सन 2023 मध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्या गणेशोसव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, व्दितीय क्रमांक 2 लाख 50 हजार रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये असे आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सन 2023 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कार समितीचे अध्यक्ष संजय तेली यांनी दिली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची खालील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल-

 पर्यावरणपूरक मूर्ती – 10 गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल व प्लास्टिक विरहित) -15 गुण, ध्वनीप्रदूषण विरहीत वातावरण -5 गुण, पाणी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन इ. समाज प्रबोधन/ सामाजिक सलोखा संदर्भात सजावट/ देखावा/ स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात/ छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/ देखावा- 20/25 देखाव्याप्रमाणे, गणेशोत्सव मंडळाने वर्षभरात रक्तदान शिबीर, गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, ॲम्ब्युलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इ. सामाजिक कार्य (अनु. क्र.6 व 7 व्यतिरिक्त) – 20 गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थिंनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य इ. बाबत केलेले कार्य – 15 गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इ. बाबत केलेले कार्य – 15 गुण, पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा -10 गुण, पारंपरिक / देशी खेळांच्या स्पर्धा- 10 गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस 5 गुण)- 25 गुण याप्रमाणे आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…