Home राजकीय पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना अजित पवार कडून मिळाले गिफ्ट

पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना अजित पवार कडून मिळाले गिफ्ट

1 second read
0
0
43

no images were found

पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना अजित पवार कडून मिळाले गिफ्ट

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेडचे येथील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगाव येथील आमदार दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी गिफ्ट दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना गिफ्ट मिळाले आहे.

आता अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्याला आदिवासी भागाच्या विकासासाठी भरुभरुन निधी त्यांना दिला आहे. दिलीप वळसे यांच्या मतदार संघात 29 कोटी 80 लाखांचा निधी आदिवासी भागाच्या विकासासाठी, तर बिगर आदिवासी भागाच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी दिला आहे.

तसेच खेड तालुक्याला पश्चिम पट्ट्याच्या विकासासाठी दिलीप मोहिते यांना 25 कोटींचा निधी दिला. पावसाळी अधिवेशनात 80 कोटींचा निधी अजित पवार यांनी दिला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत अजित पवार यांनी बंड करत . अजित पवार यांच्यासह नऊ जण शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले.यावेळी त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे.

 या आमदारांनी विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत आल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार अजित पवार यांनी त्यांना गिफ्ट दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना गिफ्ट मिळाले आहे.

पुणे जिल्ह्यातील खेडचे येथील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगाव येथील आमदार दिलीप वळसे पाटील यांन अजित पवार यांची साथ घेतली.

यावेळी आपण आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. आता या दोघांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे गिफ्ट मिळाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…