Home Video जुलै ३ तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार :उपमुख्यमंत्री 

जुलै ३ तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार :उपमुख्यमंत्री 

0 second read
0
0
139

no images were found

जुलै ३ तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार :उपमुख्यमंत्री 

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रडखडलेला आहे. याशीच संबंधित एक मोठी बातमी आता समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.या भेटीनंतर फडणवीस यांनी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन किंवा तीन खासदरांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्याता आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यातच आता राज्य मंत्रीमंडळाच्या आगामी विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केलीआठवले पुढे म्हणाले, आगामी मंत्रिमंडळ विस्तारत ‘रिपाइं’ला एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत ‘रिपाइं’ला योग्य वाटा मागितला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…