गोकुळच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची बिनवरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष कोल्हापुर: गोकुळ दूध संघावर महाड़िक गटाची असणारी सत्ता माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ़ यांच्या हाती आल्यानंतर या गटाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील तथा आबाजी यांचा दोनं वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील दोन वर्षासाठी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची पुढील दोन वर्षासाठी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष म्हणून आज बिनविरोध निवड करण्यात आली . दुग्ध विभागाचे जिल्हा उपनिबंधक डॉ अरुण कदम यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ बैठकीत अरुण डोंगळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा डॉ .अरुण कदम यानी केली. या निवडी नंतर मावळते अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आणि नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा जिल्हा उपनिबंधक डॉ अरुण कदम यांच्या हस्ते पुष्पहार आणि शाल श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या निवडी साठी झालेल्या सभेच्या ठिकाणी विद्यमान सत्ताधारी गटाचे नेते सतेज पाटील ,हसन मुश्रीफ़ आणि गोकुळ दूध संघाच्या विरोधी संचालकापैकी प्रमुख एक संचालिका असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक ,डॉ चेतन नरके हे कोणीही उपस्थित नव्हते .गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले ,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले संचालक मुरलीधर जाधव ,अन्य संचालक मात्र उपस्थित होते .जिल्हा उपनिबंधक डॉ अरुण कदम यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष निवडीची सभा गोकुळ दूध संघाचे मुख्यालय असलेल्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पस्थळी झाली . या ठिकाणी अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अरुण डोंगळे यानी पत्र कारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यानी दुग्ध व्यवसाय आणि शेतीपुरक व्यवसायापासून दूर होत चाललेल्या तरुण वर्गाला पुन्हा या व्यावसायात नव्या जोमाने कार्यरत करणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगितले . गोकुळ दूध संघातील पूर्वीचे सत्ताधारी मित्र आणि आताचे विरोधक यांच्याविषयी विचारले असता आम्ही स्क्रिप्टनुसार गोकुळ दूध संघाच्या प्रगतीसाठी आमची भूमिका चोख बजावत आहोत . पण विरोधकांची स्क्रिप्ट आणि भूमिका दोन्हीही बदलत असल्याचा आरोप केला .