no images were found
सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे 29 मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन !
कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या जागृतीसाठी ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने सोमवार, 29 मे 2023 या दिवशी कोल्हापूर येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे संपेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वप्रथम धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची संकल्पना समाजासमोर मांडली. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय असून ते विश्वासाठी मार्गदर्शक ठरेल, हेही त्यांनी लक्षात आणून दिले. तेव्हापासून सहस्रो हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, देशभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना या हिंदु राष्ट्र संघटनेच्या कार्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत आहेत. हिंदु राष्ट्र जागृती अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचनांचे आयोजन करणे, असे उपक्रमही राबवण्यात आले आहेत.
हिंदु धर्मावरील संकटे दूर होण्यासाठी हिंदू ऐक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडीचे’ आयोजन करण्यात आले आहे. या हिंदु एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपारिक वेशभूषा परिधान करून नामजप करत, तसेच काही जण भजने म्हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. राष्ट्रपुरूष, क्रांतीकारक, पराक्रमी हिंदु राजे यांनी केलेल्या महान कार्यातून बोध घेण्यासाठी प्रबोधनही या फेरीत केले जाणार आहे. या फेरीत विविध संप्रदाय, तसेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार असून काळाची आवश्यकता ओळखून सध्याच्या स्थितीला स्वरक्षण, प्रथमोपचार यांविषयीचे प्रशिक्षण लोकांनी शिकून घ्यावे याविषयीही जनजागृती या वेळी करण्यात येणार आहे. या फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संघटना, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय सहभागी होणार आहेत. तरी संघटितपणाचा संदेश देणार्या प्रबोधनपर ‘हिंदू एकता दिंडी’त समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.