no images were found
मैत्री’ मालिकेने केला 100 भागांच्या प्रसारणाचा टप्पा पार
‘झी टीव्ही’वरील ‘मैत्री’ या मालिकेत मैत्री (श्रेणू पारिख) आणि नंदिनी (भाविका चौधरी) या दोन अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिणींची कथा सादर करण्यात आली आहे. मैत्री आणि नंदिनी या दोघी बालपणापासूनच एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असतात. आपली मैत्री कोणी कधीच तोडू शकणार नाही आणि आपण लग्नानंतरही एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी राहू, याची या दोघींना पक्की खात्री असते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. आता मालिकेच्या कथानकाचा काळ सहा वर्षांनी पुढे नेण्यात आल्यानंतर मालिकेतील नातेसंबंधांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. विशेषत: मैत्री आणि नंदिनी यांच्या मैत्रीच्या नात्याने वेगळेच वळण घेतले आहे. हर्षच्या (समर्थ जुरेल) प्रवेशामुळे मैत्रीच्या स्टार्ट-अप व्यवसायात अनपेक्षितपणे हस्तक्षेप होत आहे. आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना काही नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला मिळतील. पण मैत्रीच्या टीमने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा पार केला. या मालिकेने 100 भागांचे प्रसारण पार पाडल्याची कामगिरी केल्याने जल्लोष करणे स्वाभाविकच होते.
या महत्त्वाच्या कामगिरीचा जल्लोष सेटवरच एक केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप मजेत वेळ व्यतीत केला. मालिकेने इतके भाग प्रसारित केल्यामुळे स्पॉटबॉयपासून कलाकारापर्यंत प्रत्येकजण खुशीत होता.