Home Uncategorized राजस्थानमध्ये विमान कोसळले; 4 ग्रामस्थांचा मृत्यू

राजस्थानमध्ये विमान कोसळले; 4 ग्रामस्थांचा मृत्यू

2 second read
0
0
44

no images were found

राजस्थानमध्ये विमान कोसळले; 4 ग्रामस्थांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या  हनुमानगड येथे मिग 21 हे विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. विमानाचा अपघात होणार असल्याचं कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला असता. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतली. त्यामुळे तो बचावला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

आज सकाळी ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. हे हवाई दलाचं विमान सूरतगडला जात होतं. उड्डाण घेतल्यानंतर 15 मिनिटात तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं. तरीही या पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र,विमानात बसल्याने अपघात होणार असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने तात्काळ पॅराशूट घालून विमानातून उडी मारली. त्यामुळे विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. त्यांना काही झालं नाही. मात्र, नंतर विमान हनुमागड येथे कोसळलं.

हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …