Home राजकीय गुलाबराव पाटील यांचाकडून  मोठा गौप्यस्फोट, अजितदादा आमच्याकडे येणार

गुलाबराव पाटील यांचाकडून  मोठा गौप्यस्फोट, अजितदादा आमच्याकडे येणार

3 second read
0
0
112

no images were found

गुलाबराव पाटील यांचाकडून  मोठा गौप्यस्फोट, अजितदादा आमच्याकडे येणार

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार  यांच्या भाजपमध्ये येण्याची चर्चा जोरात आहे. ही चर्चा थांबण्यास तयार नाही.  आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे. अजित पवार शिवसेना-भाजप युतीच्या सरकारसोबत येणार आहे की नाही? यासंदर्भातील गौप्यस्फोट केला आहे. यामुळे अजित पवार यांच्यासंदर्भातील चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या? हे सांगू असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी बैठका झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवार यांनीही याच मुद्द्यावर मत मांडलं होतं. या विषयासंदर्भात गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…