no images were found
न्यू पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांची Hyundai कंपनीत निवड
कोहापूर ( प्रतिनिधी ) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची Hyundai Construction Equipment India या कन्स्ट्रक्शन क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणाऱ्या एक्सकॅव्हेटर सारखी अद्ययावत मशिनरी बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ट्रेनी इंजिनिअर या पदावर ऑन रोल निवड झाली. या विद्यार्थ्यांना वार्षिक वेतन पहिल्या वर्षी 2.56 लाख आणि दुसर्या वर्षी रू. 3.26 लाख मिळणार आहे. रोहीत सावेकर, किरण जाधव, दिगंबर जत्राटे व तेजस जाधव हे निवड झालेले विद्यार्थी आहेत. सदरचे इंटरव्ह्यू न्यू पॉलिटेक्निकमध्ये कंपनीने ऑनलाईन पद्धतीने घेतले होते. या इंटरव्ह्यूसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट व काॅर्पोरेट रिलेशन्स ऑफीसर प्रा. किरण वळीवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील आणि प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.