Home सामाजिक टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

0 second read
0
0
197

no images were found

टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकार आता टोल टॅक्स नियमात मोठा बदल करण्यात येणार आहे, याचा थेट फायदा करोडो वाहनधारकांना होणार आहे. यासोबतच नितीन गडकरी म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस देशभरात २६ ग्रीन एक्स्प्रेस वे बांधले जातील आणि नवीन टोल नियमही जारी केले जातील.

येत्या काही दिवसांत टोल वसुलीसाठी दोन पर्याय देण्याचा सरकार विचार करत आहे. यामध्ये गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे हा पहिला पर्याय आहे. तर दुसरी पद्धत आधुनिक नंबर प्लेटशी संबंधित आहे. सध्या त्यासाठी नियोजन सुरू आहे.

टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे.  यासोबतच आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स कापला जाईल. त्यासाठी वेगळी कारवाई केली जाणार नाही. आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही, थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल, असं केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…