Home मनोरंजन इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ला अखेरीस मिळाले ‘बेहतरीन तेरह’

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ला अखेरीस मिळाले ‘बेहतरीन तेरह’

1 second read
0
0
35

no images were found

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ला अखेरीस मिळाले ‘बेहतरीन तेरह’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रियालिटी शो,इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ची दमछाक करवणारी ऑडिशन फेरी आणि त्यानंतरची खडतर मेगा ऑडिशन पूर्ण होऊन आता या स्पर्धेत टिकून राहिलेले ‘बेहतरीन तेरह’ स्पर्धक आता प्रेक्षकांसमोर आले आहेत.सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या EENT स्पेशलिस्ट परीक्षकांनी सर्वोत्तम तेरा स्पर्धकांची निवड केली आहे, ज्यांनी आपले नृत्यकौशल्य दाखवून आपली पात्रता सिद्ध केली आहे आणि आपल्या पुढील प्रवासासाठी ते सज्ज आहेत.

‘डान्सचा चार्ली चॅप्लिन’ हे बिरुद देऊन टेरेन्स लुईसने ज्याचा गौरव केला, त्या नवी दिल्लीच्या अनिकेत चौहानने तर ऑडिशन फेरीतच ‘ए हैरते आशिकी’ गण्यावरील आपल्या फ्रीस्टाइल परफॉर्मन्सने परीक्षकांना अशी काही भुरळ घातली की, त्याला थेट ‘बेहतरीन तेरह’ मध्ये स्थान मिळाले. अशी थेट झेप घेणारा तो IBD च्या इतिहासातील पहिला स्पर्धक ठरला. महाराष्ट्राच्या शिवम वानखेडेने आपल्या खास व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचे हे व्यक्तिमत्व त्याच्या डान्समधून देखील झळकताना दिसले, जेव्हा त्याने बॉलीवूड स्टाइलमध्ये ‘के पग घुंघरू बांध’ गाण्यावर परफॉर्म केले. त्याचा तो परफॉर्मन्स इतका मनोरंजक होता की सोनाली बेंद्रेला तर शिट्टी मारायची इच्छा झाली.

महाराष्ट्राच्या समर्पण लामाला तर जॅकपॉट लागला आणि जिथल्या तिथे त्याची ‘बेहतरीन तेरह’ मध्ये निवड झाली. ‘क्या मुझे प्यार है’ गाण्यावरील त्याच्या कंटेम्पररी डान्सने थेट परीक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्याच्या फुटवर्कने थक्क होत, परीक्षक गीता कपूरने त्याच्या पायाला काला टीका लावला.

पंजाबचा पुत्तर राम बिष्ट याने कंटेम्पररी परफॉर्मन्स देऊन सर्वांना हेलावून टाकले. त्याचे डान्सबद्दलचे वेड त्याच्या परफॉर्मन्समधून व्यक्त झाले आणि कधीही हार न मानण्याची त्याची वृत्ती पाहून सर्व परीक्षकांचे डोळे पाणावले. सोनाली बेंद्रे म्हणाली की तिला त्याच्या डान्समधून त्याच्या भावना अनुभवता आल्या.

मध्य प्रदेशच्या अक्षय पालने ‘एक पल का जीना’ गाण्यावर दमदार परफॉर्मन्स देत आपले पॉपिंगचे कौशल्य दाखवले. त्याचा बॅटल पार्टनर पश्चिम बंगालचा बूगी एलएलबी यानेही तोडीस तोड पॉपिंग परफॉर्मन्स ‘दिल क्यों ये मेरा’ गाण्यावर दिला. त्यांचे बॅटल म्हणजे या एपिसोडचा सर्वोच्च बिंदू होता, जेव्हा त्या दोघांनी ‘प्यार किया तो निभाना’ गाण्यावर परफॉर्म करून मंच दणाणून सोडला.
असे एकापेक्षा एक डान्सर या डान्स दंगलीसाठी सज्ज झाले आहेत, त्यामुळे ही स्पर्धा नक्की अटीतटीची होणार, यात शंका नाही!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…