Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख डॉ. शरद बनसोडे नवे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख डॉ. शरद बनसोडे नवे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक

0 second read
0
0
296

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख

डॉ. शरद बनसोडे नवे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख यांची आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालकपदी डॉ. शरद बनसोडे यांची निवड आज घोषित करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज या दोघांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पदासाठी गेल्या आठवड्यात मुलाखती घेण्यात आल्या. आज त्यांची निवड घोषित करण्यात येऊन नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील, डॉ. पी.डी. राऊत, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, संगणक विभागाचे प्रभारी संचालक अभिजीत रेडेकर, सहाय्यक कुलसचिव सुनीता यादव आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…