no images were found
इंडियाज बेस्ट डान्सरच्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षक काय पाहणार-सोनाली बेंद्रे
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रियालिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर तिसरे सत्र घेऊन येत आहे त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांचा उत्साह लक्षणीय आहे. 8 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता सुरू होत असलेल्या या कार्यक्रमात देशाच्या काना-कोपऱ्यातून आलेले डान्सवेडे उमेदवार ऑडिशन फेरीत EENT (एन्टरटेन्मेंट ,इमोशन, न्यूनेस आणि टेकनिक) या चतुःसूत्रीचे भान ठेवून सोनाली बेंद्रे, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर या परीक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. टेरेन्स लुईस आणि गीता कपूर हे परीक्षक स्पर्धकांना ‘टेकनिक’ आणि ‘न्यूनेस’ या निकषांवर तपासतील, तर सोनाली बेंद्रे त्यांना ‘एन्टरटेन्मेंट’ आणि ‘इमोशन’च्या मोजपट्टीने तपासेल. डान्सच्या नवीन युगात या सत्रात तेच स्पर्धक तग धरून राहतील आणि पुढे जातील, ज्यांच्या मूव्ह्ज् सार्थ असतील आणि या कला प्रकारातून ते स्वतःला कसे अभिव्यक्त करतात हे या स्पर्धेत तपासले जाईल.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये परीक्षक म्हणून या स्पर्धेकडून तिच्या काय अपेक्षा आहेत हे तिने सांगितले, तसेच इंडियाज बेस्ट डान्सर सत्र 3 मध्ये सहभागी होणे हा तिच्यासाठीही नवीन शिकण्याचा प्रवास असणार आहे, असे तिने सांगितले.