
no images were found
कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार
सांगली : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठच्या शेतात काल 14 फुटी मगर आढळून आली होती. दोन महाकाय मगरीच्या भांडणात आणि या मगरीचे वय झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मादी जातीची ही मगर होती. काल नदी काठी ही मगर एका शेतात निपचित पडून होती. मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची बरीच गर्दी झाली होती. शेतात मगर असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कळवल्यानंतर कर्मचाऱ्यांना मगरीची बऱ्याच वेळापासून हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. तिची तपासणी केली असता ती मयत झाल्याचे समोर आले. या मगरीचे शवविच्छेदन करून वन विभागाक्डून कुपवाड येथे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अहवाल आल्यावरच मगर कश्यामुळे मयत झाली हे सांगता येणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.