no images were found
अमृत १ योजनेमधूननवीन संप बधाण्याचे काम ८०% पूर्ण
कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणी पुरवठा अखत्यारीत कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्रामधून कसबा बावडा व कावळा नाका वितरण शाखेमार्फत शुध्द पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलशुध्दीरकण केंद्राच्या परिसरामध्ये पाणी साठवणूक करण्याकरीता दगडी बांधकामाचा संप महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून १९७२ साली बांधण्यात आलेला आहे. हा संप दगडी स्वरुपाचा असून यापुर्वी या संपाची १२-१३ वर्षापुर्वी महापालिकेच्या स्व निधीतून दुरुस्तीची व गाळ काढण्याची कामे केलेले आहे. तसेच या संपामध्ये येणा-या रॉ वॉटर व जाणा-या फिल्टर वॉटर पाईपचे काम साधारणत: ४ वर्षापुर्वी पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले होते. त्यावेळी त्यामधून होणा-या पाण्याची गळती थांबविण्यात आलेली होती. हा दगडी बांधकामाचा संप पुर्वीचा असल्याने याठिकाणी अमृत १ योजनेमधून नवीन संप बांधण्याचे काम प्रस्तावित केलेले होते. सदरचे काम ८० टक्के पुर्ण झालेले असून लवकरच उर्वरीत काम पुर्ण करण्यात येणार आहे. हे काम पुर्ण झालेनंतर जुना संप वापरणे बंद केले जाणार आहे. याठिकाणी मागील ५ ते ६ वर्षापासून संपाच्या तळातून व भिंतीतून पाण्याचे लिकेज होत असून सदरचे लिकेजचे पाणी हे संप चे एका कोप-यातून बाहेर एकत्रित करून पुन्हा संपाने उचलून रि-सायकल संपामध्ये टाकण्यात येते. त्यामुळे या पाण्याचा पुर्नवापर करण्याचे तात्पुरते नियोजन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.