Home राजकीय रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नेते शिंदे गटात

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नेते शिंदे गटात

1 second read
0
0
44

no images were found

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नेते शिंदे गटात

राजापूर : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अजित नारकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत पडवे गावचे गावप्रमुख दत्ताराम ठुकरूल, पडवेच्या सरपंच रूची बाणे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

राजापूर अर्बन बँकेचे संचालक, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ संगमेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे., संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीचे सरपंच समिरा अ. मजीद खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अजीम उमर खान, त्यांच्यासमवेत आनंद बापट, अमित दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य स्वाती तांबे, यशवंत तांबे, जगन्नाथ वतांबे, श्रीराम मेस्त्री, बाळकृष्ण तांबे, स्वप्नील तांबे, ओंकार अवसरे यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याची माहिती शिंदे गटाचे तालुकाप्रमुख हाजू यांनी दिली. या सर्व प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाणार असून, भविष्यामध्ये पडवे गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मिळवून दिला जाईल, असेही हाजू यांनी आश्‍वासित केले.

गेल्या काही दिवसांपासून अल्ताफ संगमेश्वर यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि डिंगणी ग्रामपंचायत शिंदे शिवसेनेकडे आली आहे. विशाल कदम, भगवान खाडे, नीता कदम, वसंत राऊत, अनिल कदम, मुनिरा पावसकर, हसिना खान, मैनुद्दीन वागले, फहीम जुवळे, आरबाज खान, चंद्रकांत कदम, अमित गमरे, सुनील कदम, नागचंद कदम, अफसर मिरकर, निहाल मिरकर, सोहेल सय्यद, सफिर शाह, उदय जोगले, सुनीता कदम, रमेश मोहिते, दिलीप कदम, सरिता कदम, रेश्मा मोहिते आदींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.अर्पिता मंगेश काष्टे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनीही सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…