no images were found
सांगलीचा प्रमोद चौगुले हा एमपीएससीत दुसऱ्यांदा राज्यात पहिला
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद चौगुले यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.त्यांना 633 गुण मिळाले. कुटुंबाच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे चौगुले यांनी सांगितले.
खुल्या गटात शुभम पाटील यांनी, तर महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळविला. आता उमेदवारांना 3 ते 10 मार्च या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येतील. पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यात पहिले आलेले चौगुले यांचे वडील टेम्पो चालक होते, आई शिलाईचे काम करीत होती. पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. कुटुंबाच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे चौगुले यांनी सांगितले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनी येथे झाले. वडिलांसारखो तो ड्रायव्हर बनला नाही तर त्याने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अनोखं यश मिळवले. परिस्थितीवर मात करत त्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. एमपीएससीचा निकाल लागला आणि सांगली जिल्ह्याच्या बाबतीत एक अलौकिक इतिहास घडला. सांगलीचा प्रमोद चौगुले हा दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला. 2020 च्या परीक्षेत ही तो राज्यात पहिला आला होता. त्यावेळी त्याची उद्योग उपसंचालक म्हणून निवड झाली होती.
यावर तो समाधानी नव्हता. प्रमोदचं स्वप्न काही तरी वेगळचं होते. पोलीस खात्यातील डीवायएसपी या पदाचे त्याला आकर्षण होते. त्यामुळे आता मिळालेल्या यशावर तो खूश नव्हता. म्हणून प्रमोदने पुन्हा 2021 ला एमपीएससीची परीक्षा दिली आणि तो आणखी एकदा राज्यात पहिला आला आहे. असा इतिहास घडवणारा प्रमोद हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.