Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाचा  दीक्षांत समारंभ स्थगित 

शिवाजी विद्यापीठाचा  दीक्षांत समारंभ स्थगित 

8 second read
0
0
76

no images were found

शिवाजी विद्यापीठाचा  दीक्षांत समारंभ स्थगित 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ १६  फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केला होता. हा  दीक्षांत समारंभ अवघ्या दोन दिवसावर आला असताना आता तो रद्द झाला आहे. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह एन. जाधव यांच्या सहीने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. 
 
  काही कारणास्तव १६ फेब्रुवारी रोजी होणारा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आला असून
या कार्यक्रमाची नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून कळवण्यात येईल असे या पत्रकात म्हंटले आहे. 
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांसमारंभासाठी शिष्टाचाराप्रमाणे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशायारी यांना निमंत्रित केले होते. पण कोशियारी यांचे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर पुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या कार्यक्रमासाठी त्यांच्या उपस्थितीला प्रखर विरोध झाला. याच दरम्यान भगतसिंग कोशियारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवले आणि नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला स्थगितीनंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ घ्यावा लागणार आहे.

 
  
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …