Home मनोरंजन गणेश चतुर्थीच्या उत्सवात टिकाऊपणावर भर देत आहेत सोनी सबचे आघाडीचे कलाकार

गणेश चतुर्थीच्या उत्सवात टिकाऊपणावर भर देत आहेत सोनी सबचे आघाडीचे कलाकार

17 second read
0
0
31

no images were found

गणेश चतुर्थीच्या उत्सवात टिकाऊपणावर भर देत आहेत सोनी सबचे आघाडीचे कलाकार

 

गणेश चतुर्थी एक अत्यंत उत्साहाने, हर्षोल्लासाने साजरा होणारा सण आहे. सुखकर्ता आणि विघ्नहर्ता गणेश ही हुशारी आणि बुद्धीची देवता आहे. या सणाच्या निमित्ताने भक्तगण आणि समुदाय एकत्र येतात त्यामुळे सणाचा आनंद साजरा करताना चांगल्या प्रथा अंगिकारणे आवश्यक आहे. या वर्षी, सोनी सबचे कलाकार इको-फ्रेंडली गणेश मूर्तीचा आणि गणेश उत्सवातील चांगल्या सवयींचा पुरस्कार करत आहेत.

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करत असलेला अभिनेता सुजय रेऊ म्हणतो,

“समस्त ‘श्रीमद् रामायण’च्या टीमच्या वतीने मी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो. मुंबई लहानाचा मोठा झाल्यामुळे गणेश चतुर्थीचा सण माझ्यासाठी खूप खास आहे. मात्र उंबरगाव येथे शूटिंग सुरू असल्याने यंदा गणेश चतुर्थीला मी मुंबईत असणार नाही. पण बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी जवळपासच्या एखाद्या गणेश मंडपात दर्शनास जाईन. गणेश मूर्ती इको-फ्रेंडलीच असल्या पाहिजेत असे माझे ठाम मत आहे, कारण तसे असेल तर पाणी आणि हवेचे प्रदूषण बरेच कमी होते आणि आपली सुंदर परंपरा जोपासताना पर्यावरणाचे देखील रक्षण होते. यावर्षी इको-फ्रेंडली मूर्ती आणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ या आणि आपल्या भक्तीमुळे शाश्वत भविष्याला समर्थन मिळेल, याची खातरजमा करू या.

 वंशज मालिकेत यश तलवार ही व्यक्तिरेखा साकारत असलेला शालीन मल्होत्रा म्हणतो,

“गेल्या चार, पाच वर्षांपासून मी घरी गणेश स्थापना करत आहे आणि हा अनुभव फारच सुंदर आहे. गणेशाच्या आगमनामुळे घर जिव्हाळा, सकारात्मकता आणि आध्यात्मिकतेने भरून जाते. हा सण लोकांना एकत्र आणतो, आपले आप्त-स्वकीय बाप्पाच्या दर्शनाला येतात, त्या निमित्ताने सगळ्यांशी गाठभेट होते. आमच्या घरात आग लागली होती, त्यानंतर आम्ही गणपती बसवण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून बाप्पा आमच्यासाठी सकारात्मकतेचा स्रोत बनला आहे. आम्ही अशी मूर्ती असतो, ज्यामध्ये बिया, माती, कागदाचा लगदा असतो, ज्या गोष्टी पर्यावरणाचे नुकसान करत नाहीत. ही मूर्ती पाण्यात विरघळून जाते किंवा झाडाच्या मातीशी एकरूप होते त्यामुळे मागे काहीही कचरा राहात नाही आणि पर्यावरणाचे रक्षण होते.”

 पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत प्रार्थनाची भूमिका करणारी इंद्राक्षी कांजीलाल म्हणते,

“इको-फ्रेंडली मूर्ती निवडणे फार महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे रक्षण होते. इको-फ्रेंडली मूर्तींमुळे जलाशये स्वच्छ राहतात, कारण या मूर्ती जराही कचरा मागे न ठेवता पूर्ण विरघळून जातात. अशाच मूर्ती वापरण्याबाबत मी आग्रही आहे. मला वाटते, निसर्गाचे जतन करताना त्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो.”

वंशज मालिकेत युविकाची भूमिका करत असलेली अंजली तत्रारी म्हणते,

“गणेश चतुर्थीची मी आतुरतेने वाट बघत आहे. या सणाची ऊर्जा आणि आध्यात्मिक वातावरण मनाला प्रफुल्लित करते. आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्या मूर्तीकडे नुसते बघत राहिले तरी शांत वाटते. मला वाटते देवाची भक्ती आणि निसर्गाची देखभाल या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या असल्या पाहिजे. या सणानंतर प्रदूषित झालेले समुद्रकिनारे बघताना मन विषण्ण होते. त्यामुळे मी नेहमीच इको-फ्रेंडली गणेश मूर्ती निवडते. तसे केल्याने ती देवता आणि पर्यावरण दोघांचा मान राखला जातो. आपण या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करू शकतो आणि ती माती झाडांना घालू शकतो. सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

 ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका करत असलेला बसंत भट्ट म्हणतो,

“आमच्या घरी गणपतीची मूर्ती आणत नाहीत, आमच्याकडे ती परंपरा नाही, पण त्या निमित्ताने आम्ही घरी पूजा करतो, देवघर स्वच्छ करतो आणि गोडाधोडाचे जेवायला करतो. लहानपणापासून ही माझी आवडती परंपरा आहे. मी गणेश चतुर्थीची उत्साहाने वाट बघतो. मूर्तीच्या शाश्वततेचा विचार केल्यास, पर्यावरण आणि समाज कल्याण याला महत्त्व देऊन मूर्तीची निवड केली पाहिजे, असे मला वाटते.”

 ‘बादल पे पांव है’ मालिकेत रजतची भूमिका करणारा आकाश आहुजा म्हणतो,

“गेल्या दोन वर्षांपासून आमच्या घरी आम्ही गणेश मूर्ती आणत आहोत. आणि गेल्या वर्षी तर दिल्लीच्या माझ्या घरी मी गणेश स्थापना केली होती. दिल्लीतल्या या उत्सवाला मुंबईची सर नसली तरी, आमचा बाप्पा आमच्या दिल्लीच्या घरातही तोच आनंद आणि सकारात्मकता घेऊन आला! ते दीड दिवस आनंदाने, उत्साहाने भारलेले होते. आम्ही इको-फ्रेंडली गणेश मूर्ती आणली होती. दुसऱ्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले, तेव्हा ती मूर्ती पुन्हा मातीच्या रूपात परतली! त्या मातीचा उपयोग एक नवे रोप लावण्यासाठी करावा असे आम्ही ठरवले. या अनुभवामुळे शाश्वततेची संकल्पना मला अधिक भिडली. आपण बघतो, की आजकाल बरेच लोक इको-फ्रेंडली मूर्तीच निवडतात. मला वाटते, हे एक सकारात्मक आणि प्रगत पाऊल आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…