Home क्राईम  हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

 हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

6 second read
0
0
43

no images were found

 हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपूरीमधील  सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांने हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज (दि.0९) सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.‌४८ वर्षीय जयसिंग ज्ञानदेव कणसे असे मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावचे ते रहिवासी आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार काल (दि.0८) बुधवारी रोजी दुपारी जयसिंग ज्ञानदेव कणसे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. डोक्याला वर्मी मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, हॉस्पिटल प्रशासनाने याबाबतची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवली, मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आला. हॉस्पिटल परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…