no images were found
३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराने दिल्ली पुन्हा हादरली
नवी दिल्ली : एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात घडली आहे.ती चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात जंगलात सापडली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुकलीवर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या दोन पोलिसांनकडून आरोपींना अटक केली आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रामनिवास पानिका आणि शक्तीमान सिंह अशी अटक केलेल्या आरोपांची नाव आहेत.
हे दोन्ही आरोपी विवाहित असून दोघेही एका कचरा पुनर्वापर कंपनीत सहाय्यक म्हणून काम करतात. ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे.मुलीच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मुलगी घरात न आढळल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, तिने त्या मुलीला वस्तीजवळील जंगलात पाहिले होते. महिलेने असेही सांगितले की तिने दोन पुरुषांना जंगलाच्या दिशेने जातानाही पाहिले होते.महिलेकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जंगलात शोधाशोध केली असता तेथे मुलगी रडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात मुलीच्या आई वडिलांना मानसिक धक्का बसला असला तरी आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले आहेत.