Home Uncategorized अभिषेक निगम नवीन व अनोख्‍या अवतारामध्‍ये राज्‍य करण्‍यासह ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’चा शुभारंभ!

अभिषेक निगम नवीन व अनोख्‍या अवतारामध्‍ये राज्‍य करण्‍यासह ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’चा शुभारंभ!

52 second read
0
0
129

no images were found

अभिषेक निगम नवीन व अनोख्‍या अवतारामध्‍ये राज्‍य करण्‍यासह ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’चा शुभारंभ!

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन स्‍टार अभिनेता अभिषेक निगम सोनी सबवरील ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’च्‍या कलाकारांमध्‍ये सामील होण्‍यास सज्‍ज आहे. तो अलिबाबाची प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. मालिकेच्‍या या नवीन व्‍हर्जनमध्‍ये अभिषेक प्रमुख भूमिका साकारणार आहे आणि उत्‍साहवर्धक नवीन अवतारामध्‍ये दिसण्‍यासोबत अलीच्‍या भूमिकेत नवीन ऊर्जेची भर करणार आहे. अधिक स्‍मार्टनेस, आक्रमकता व मार्शल आर्ट्सच्‍या नवीन तंत्रांसह अली परिपूर्ण आहे आणि नेहमी त्‍याच्‍या प्रतिस्‍पर्धींच्‍या दोन पावले पुढे असतो. त्‍याच दयाळू वृत्तीसह अली परवाजमध्‍ये परतणार आहे आणि त्‍याचा प्रवास सुरू ठेवणार आहे, जे पाहणे रोचक असणार आहे.

या मालिकेच्‍या कलाकारांमध्‍ये सामील होण्‍यापूर्वी सोनी सबवरील लोकप्रिय मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’मधील प्रमुख भूमिकेसाठी अभिषेक निगमवर प्रेमाचा वर्षाव करण्‍यात आला होता. ही मालिका अत्‍यंत यशस्‍वी ठरण्‍यासोबत प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. अभिषेक निगम सोनी सबवर अलिबाबाच्‍या भूमिकेत करत असलेल्‍या प्रवेशासह दोन वर्षांनंतर टेलिव्हिनवर पुनरागमन करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा कोल्हा…