Home क्राईम अमरावतीहून पुण्यात आलेल्या अख्ख्या कुटुंबाची सामुहिक आत्महत्या

अमरावतीहून पुण्यात आलेल्या अख्ख्या कुटुंबाची सामुहिक आत्महत्या

2 second read
0
0
123

no images were found

अमरावतीहून पुण्यात आलेल्या अख्ख्या कुटुंबाची सामुहिक आत्महत्या

पुणे: अमरावतीहून पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये घडली आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि आर्थिक नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा कयास आहे.
दीपक थोटे, इंदू थोटे, मुलगा ऋषिकेश थोटे, मुलगी समीक्षा थोटे अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. संबंधित कुटुंबीय मूळचे अमरावतीचे असून दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. मुलाचे वय २१ तर मुलीचे वय १७ होते. मुंढवा परिसरात संबंधित थोटे कुटुंब राहत होते. मागील काही दिवसांपासून संबंधित दाम्पत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे पती-पत्नी आर्थिक समस्येने मानसिक तणावाखाली होते.
कौटुंबिक गरजा भागविताना त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २१ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून नंतर पती- पत्नीने औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…