Home राजकीय संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0 second read
0
0
122

no images were found

संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : संजय राऊत यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली. 22 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना औषधे आणि घरचे जेवण मिळावे अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना संबंधित औषधं उपलब्ध करुन देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. न्यायालयाने संजय राऊत यांची वैयक्तिक बेडची मागणी फेटाळली आहे. जेल प्रशासनातर्फे उपलब्धतेनुसार बेड दिले जावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी मुख्य वैद्यकीय अधिकारीकडून करावी आणि तो अहवाल कोर्टात दाखल करावा असे निर्देश ही न्यायालयाने दिले आहेत. संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहात नेणार आहेत.

जामिनाचा मार्ग मोकळा

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. 8 ऑगस्टपर्यंत ते ईडी कोठडीमध्ये होते. आज ईडीची कोठडी संपत असल्यानं संजय राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आलं होतं. ईडीने त्यांची कोठडी न मागितल्याने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला. यानंतर आता संजय राऊतांचा जामिनीसाठी अर्ज करण्याचा पर्याय खुला झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…