no images were found
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपत कंत्राटी पध्दतीने भरणार
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल, सैनिकी मुलींचे वसतीगृह व माजी सैनिक विश्रामगृह, येथील अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुकांनी अर्ज ६ जानेवारी २०२३ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
अतिरिक्त सहा. व्यवस्थापक, लिपिक व वाहन चालक (मराठी व इंग्रजी टापयपिंग आवश्यक) या प्रत्येकी एका पदासाठी एकत्रित मानधन२३ हजार २८३ इतके आहे. चौकीदार या एका पदासाठी १९ हजार ४४३ इतके एकत्रित मानधन आहे तर माळी या एका पदासाठी १२ हजार १२७ इतके एकत्रित मानधन आहे.आर्जाची छाननी करुन पात्र उमेंदवारांची मुलाखत दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दुपारी 11 वाजता घेण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.