Home Uncategorized महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी

महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी

5 second read
0
0
16

no images were found

महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीची सभा महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात समितीच्या सभापती सौ. कौसर इस्माईल बागवान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
        या सभेत शहरातील महिलांसाठी विविध ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती, तसेच महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व शाळांची रंगरंगोटी करण्याच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांना समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.महिला व मुलींसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचे आरोग्य व स्वच्छता राखणे आणि शैक्षणिक संस्थांमधील सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करणे, या अनुषंगाने विविध कल्याणकारी उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. मंजूर कामे तातडीने हाती घेऊन ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना सभापती सौ. कौसर बागवान यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

     सभेस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, समिती सदस्य सौ. निलिमा पाटील, सौ. प्राजक्ता जाधव, सौ. वंदना मोहिते, सौ. अरुणा गवळी, सौ. धनश्री कोरवी, सौ. अनुराधा मुळीक, सौ. जयश्री कांबळे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित सुविधा, मुलींसाठी आरोग्यदायी शालेय वातावरण आणि आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने समितीने विविध विकासकामांना मंजुरी देत सकारात्मक निर्णय घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे कोल्हापूर,  : महिल…