डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड कसबा बावडा(प्रतिनिधी): येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागाच्या १३ विद्यार्थ्यांची देशातील नामांकित आणि “राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी व एनआयटीमध्ये संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य संशोधक व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. …