कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला गती मिळणार – पालकमंत्री कोल्हापूर, : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण 5503.69 कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे आज …