Home Uncategorized चेन्‍नई ट्रेड सेंटर येथे ९ ते ११ डिसेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसीय बी-टू-बी प्रदर्शन

चेन्‍नई ट्रेड सेंटर येथे ९ ते ११ डिसेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसीय बी-टू-बी प्रदर्शन

12 second read
0
0
5

no images were found

चेन्‍नई ट्रेड सेंटर येथे ९ ते ११ डिसेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसीय बी–टू–बी प्रदर्शन

भारतातील युनिफॉर्म आणि टॉवेल उत्पादकांना एकाच व्यासपीठावर आणणारा पहिलाच उपक्रम

 चेन्नई: ‘सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन‘तर्फे (एसजीएमए) ९ ते ११ डिसेंबर २०२६ दरम्यान नंदंबक्कम येथील चेन्नई ट्रेड सेंटर येथे ‘१० व्या युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२६‘चे आयोजन करण्यात आले आहे. तामिळनाडूच्या इतिहासात युनिफॉर्म आणि टॉवेल उत्पादने एकाच प्रदर्शनात एकत्र सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.युनिफॉर्म आणि टॉवेल उद्योगासाठी हे तीन दिवसीय बी–टू–बी प्रदर्शन स्रोत व व्यावसायिक नेटवर्किंगचे प्रभावी केंद्र ठरेल. यात देशभरातील १५० हून अधिक आघाडीचे ब्रँड्स सहभागी होणार असून २५,००० हून अधिक युनिफॉर्म, फॅब्रिक व अ‍ॅक्सेसरीज आणि ३०० हून अधिक टॉवेल व सोलापुरी चादरींचे डिझाईन्स प्रदर्शित केले जातील.’एसजीएमए‘च्या अंदाजानुसार, २०२३ मध्ये जागतिक युनिफॉर्म बाजाराचे मूल्य सुमारे ६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स होते. शिक्षण, आरोग्य, हॉस्पिटॅलिटी, उत्पादन आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे २०३० पर्यंत बाजाराचा आकार वार्षिक सुमारे ४ टक्के चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे.हे प्रदर्शन वितरक, डीलर्स, किरकोळ विक्रेते, शाळा, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट खरेदीदार आणि उद्योजकांना उत्पादकांशी थेट संवाद साधण्याची, नवीन उत्पादने जाणून घेण्याची आणि व्यावसायिक भागीदारी प्रस्थापित करण्याची उत्तम संधी देईल. यामध्ये शालेय, क्रीडा, महाविद्यालयीन, औद्योगिक, कॉर्पोरेट आणि हॉस्पिटल युनिफॉर्म्स, विंटर वेअर, ब्लेझर्स, युनिफॉर्म फॅब्रिक्स, बेल्ट, टाय, लोगो व प्रिंटिंग सोल्यूशन्स, शूज, मोजे, स्कूल बॅग्ज, बाथ टॉवेल्स, चादरी, नॅपकिन्स आणि हॉटेल टॉवेल्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल.या वर्षी ‘व्हायब्रंट टॉवेल‘ उपक्रमांतर्गत टॉवेल उत्पादकांचाही विशेष सहभाग असेल. एकाच छताखाली विविध प्रकारच्या गणवेशांसह बाथ टॉवेल्स, गिफ्ट सेट्स, पूल टॉवेल्स, किचन टॉवेल्स, बीच टॉवेल्स, बाथ रोब्स आणि प्रसिद्ध सोलापुरी चादरी थेट खरेदी करण्याची सुविधा किरकोळ विक्रेत्यांना मिळणार आहे.

 

प्रदर्शनाविषयी बोलताना ‘एसजीएमए‘चे फेअर चेअरमन श्री अशोक चव्हाण म्हणाले, “२०१७ मधील पहिल्या प्रदर्शनापासून ‘एसजीएमए‘युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग परिसंस्थेला बळकट आणि आधुनिक बनवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.  हे १० वे प्रदर्शन असून युनिफॉर्मची संपूर्ण व्हॅल्यू चेन म्हणजे तयार कपडे, फॅब्रिक्स, अ‍ॅक्सेसरीज ते पादत्राणे एकाच व्यासपीठावर आणत आहे. भारतीय युनिफॉर्म आणि टॉवेल उत्पादकांना देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

 

‘एसजीएमए‘चे फेअर सेक्रेटरी श्री अनिकेत महिंद्रकर म्हणाले, “हा उद्योग डिझाईन, फॅब्रिक, तंत्रज्ञान आणि विपणनाच्या दृष्टीने झपाट्याने बदलत आहे. हे प्रदर्शन भागधारकांना नवीन प्रवाह समजून घेण्याची आणि नामांकित तसेच उदयोन्मुख उत्पादकांशी जोडले जाण्याची संधी देते. आम्ही वितरक, विक्रेते, शाळा, रुग्णालये, कॉर्पोरेट्स आणि नवउद्योजकांना या व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही  आमंत्रित करत आहोत.”सोलापूरचे युनिफॉर्म आणि टॉवेल उत्पादन क्षेत्र देशाच्या वस्त्रोद्योग परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान देत आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता, वेळेवर डिलिव्हरी आणि लहान व परत मिळणाऱ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याच्या क्षमतेमुळे सोलापूरच्या उत्पादकांनी देशभरात भक्कम ओळख निर्माण केली आहे.

     २०१७ मध्ये सोलापूरमधून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा विस्तार पुढे बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि वाराणसी अशा प्रमुख शहरांत झाला असून या उपक्रमाने ३०० हून अधिक उद्योजकांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.‘मेक इन इंडिया‘ उपक्रमाला गती देत देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करणे आणि भारतीय उत्पादकांना जागतिक युनिफॉर्म बाजारात नवीन संधी निर्माण करून देणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे.

 प्रदर्शन माहिती: * १० वे युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२६ * दिनांक: ९ ते ११ डिसेंबर २०२६ * स्थळ: चेन्नई

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शॉपर्स स्टॉपने ‘गिफ्ट्स ऑफ लव्ह’सह भेटवस्तू देण्याच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर केली

शॉपर्स स्टॉपने ‘गिफ्ट्स ऑफ लव्ह’सह भेटवस्तू देण्याच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर …