Home राजकीय कॉक्रोच जनता पार्टीच्या दबावाचे अस्त्र निष्प्रभ-हेमंत पाटील

कॉक्रोच जनता पार्टीच्या दबावाचे अस्त्र निष्प्रभ-हेमंत पाटील

6 second read
0
0
10

no images were found

कॉक्रोच जनता पार्टीच्या दबावाचे अस्त्र निष्प्रभ-हेमंत पाटील :आंदोलनासाठी परकीय निधीच्या आरोपांची सखोल चौकशीची मागणी

पुणे,: निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाची धार आता बोथट होत असल्याचे चित्र दिसत आहे. आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जामीन मिळणे, प्रमुख कार्यकर्त्यांवरील कारवाई आणि आंदोलनाच्या आर्थिक स्रोतांबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे या आंदोलनाभोवतीचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. आंदोलनाची दिशा आणि त्यामागील उद्देश यांची आता अधिक गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

       सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सोशल मीडियावर या आंदोलनामागे अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला आहे. यापूर्वीही कॉक्रोच जनता पार्टीच्या निधीच्या स्रोतांवरून राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, परकीय निधी मिळाल्याचे आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नसल्याने त्यांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. केवळ आरोपांवरून कोणालाही दोषी ठरवता येणार नाही; परंतु आंदोलनासाठी पैसा कुठून येतो, खर्च कसा होतो आणि आर्थिक व्यवहार किती पारदर्शक आहेत, याची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

      लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या राजकीय दबावामागील भूमिका, आर्थिक व्यवहार आणि प्रत्यक्ष उद्दिष्ट यांची चिकित्सा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप असतील, तर ते पुराव्यांसह घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने मांडले पाहिजेत, असे देखील पाटील म्हणाले.

कॉक्रोच जनता पार्टीने पुढील रणनीती आखण्यासाठी पुन्हा एकत्र येण्याची भूमिका मांडली असली, तरी सध्याच्या घडामोडींमुळे आंदोलनाची पूर्वीची आक्रमकता टिकवणे आव्हानात्मक दिसते. त्यामुळे आंदोलनाची धार बोथट झाली आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. भारताच्या लोकशाही संस्थांवरील विश्वास कायम राखण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि कायद्याचे पालन आवश्यक आहे. आंदोलनाच्या नावाखाली राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच कोणत्याही संस्थेविरोधातील आरोपांची सत्यता पुराव्यांच्या आधारे तपासली जावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्…