Home Uncategorized नवरात्रीदरम्यान गौतम अदाणी आणि डॉ. प्रीती अदाणी यांनी घेतली श्रीमद् राजचंद्र आश्रमाला भेट; सेवा आणि साधनेच्या संकल्पाला दिले नवे बळ

नवरात्रीदरम्यान गौतम अदाणी आणि डॉ. प्रीती अदाणी यांनी घेतली श्रीमद् राजचंद्र आश्रमाला भेट; सेवा आणि साधनेच्या संकल्पाला दिले नवे बळ

14 second read
0
0
8

no images were found

नवरात्रीदरम्यान गौतम अदाणी आणि डॉ. प्रीती अदाणी यांनी घेतली श्रीमद् राजचंद्र आश्रमाला भेट; सेवा आणि साधनेच्या संकल्पाला दिले नवे बळ

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी आणि अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी नवरात्रीदरम्यान रविवारी दक्षिण गुजरातमधील श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर (SRMD) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.गौतम अदाणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर आपला अनुभव शेअर करताना लिहिले, “प्रीती आणि मी श्रीमद् राजचंद्र आश्रम, धरमपूर येथे पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्यासोबत काही आत्मीय क्षण घालवले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. श्रीमद् राजचंद्रजी यांच्या जगातील सर्वांत उंच प्रतिमेचे चरणप्रक्षालन करणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव होता.”

        या भेटीदरम्यान पूज्य गुरुदेवश्री यांनी साधना आणि सेवा या एकमेकांना पूरक असल्याचे सांगितले. जीवन, संसाधने आणि संधी यांचा उपयोग समाजाच्या व्यापक कल्याणासाठी केला पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.गौतम अदाणी आणि डॉ. प्रीती अदाणी यांनी मिशनच्या ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन केंद्र असलेल्या ‘राज सभागृह’ येथे आयोजित सत्संगातही सहभाग घेतला. यावेळी पूज्य गुरुदेवश्री यांनी मानवी जीवनाचे उद्दिष्ट आणि आध्यात्मिक साधनेचे महत्त्व याविषयी आपले विचार मांडले. गौतम अदाणी यांनी मिशनशी संबंधित तरुणांशीही संवाद साधला. यामध्ये विविध शैक्षणिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आणि व्यावसायिक सहभागी झाले होते, जे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत.

        डॉ. प्रीती अदाणी यांनी ‘श्रीमद् राजचंद्र सर्वमंगल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर विमेन’ या केंद्राला भेट दिली. येथे त्यांनी कौशल्य विकास, उपजीविका आणि उद्योजकतेशी संबंधित कार्यक्रमांचा लाभ घेणाऱ्या आदिवासी महिलांशी संवाद साधला. याशिवाय, त्यांनी श्रीमद् राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरलाही भेट दिली आणि दिव्यांग मुलांना वैद्यकीय सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. मिशनच्या जिनमंदिरात त्यांनी भगवान महावीर यांची पूजाअर्चाही केली.

       या भेटीदरम्यान गौतम अदाणी यांनी मिशनच्या मानवसेवा विभागासोबत, म्हणजेच ‘श्रीमद् राजचंद्र लव्ह अँड केअर’ (SRLC) यांच्यासोबत संभाव्य सहकार्याच्या संधी शोधण्यात स्वारस्य दाखवले. तर डॉ. प्रीती अदाणी यांनी मिशनच्या दृष्टिसेवा (व्हिजन केअर) उपक्रमात सहकार्य करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली. हा उपक्रम अदाणी फाउंडेशनच्या कार्याशी सुसंगत आहे.

     ३५५ एकर परिसरात विस्तारलेला श्रीमद् राजचंद्र आश्रम हे मिशनचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांनी १९९४ मध्ये या मिशनची स्थापना केली. आज सहा खंडांमध्ये मिशनची १४२ हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.हे मिशन जैन आध्यात्मिक गुरू श्रीमद् राजचंद्रजी यांच्या शिकवणीपासून प्रेरित आहे. महात्मा गांधी त्यांना आपले आध्यात्मिक मार्गदर्शक मानत असत. ज्ञान, ध्यान आणि निःस्वार्थ सेवा यांच्या माध्यमातून आंतरिक परिवर्तन घडवून आणणे, हा मिशनच्या शिकवणीचा मुख्य आधार आहे.मिशनचा मानवसेवा विभाग ‘श्रीमद् राजचंद्र लव्ह अँड केअर’ आरोग्यसेवा, शिक्षण, मानवतावादी मदत, पशुकल्याण आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. या उपक्रमांमुळे जगभरातील लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

        यावर्षीच्या सुरुवातीला गौतम अदाणी यांनी अयोध्या, कोलकाता येथील कालीघाट आणि उत्तर गुजरातमधील तारंगा हिल्स येथील जैन तीर्थस्थळालाही भेट दिली होती. याशिवाय, १ मे रोजी लग्नाच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी डॉ. प्रीती अदाणी यांच्यासह केदारनाथ धाम येथे दर्शन घेतले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्…