Home Uncategorized आपल्या शिक्षण व ज्ञान व्यवहारात उपयोग झाला पाहिजे- डॉ. व्ही. एन. शिंदे : हिंदी विभागात मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार

आपल्या शिक्षण व ज्ञान व्यवहारात उपयोग झाला पाहिजे- डॉ. व्ही. एन. शिंदे : हिंदी विभागात मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार

12 second read
0
0
7

no images were found

आपल्या शिक्षण व ज्ञान व्यवहारात उपयोग झाला पाहिजे- डॉ. व्ही. एन. शिंदे : हिंदी विभागात मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार

कोल्हापूर, :   विद्यार्थ्यांनी प्राध्यापिकीबरोबरच इतर क्षेत्रातही नोकरीच्या संधी शोधल्या पाहिजेत. तसेच आपले शिक्षण व ज्ञान व्यवहारात उपयोगात आले पाहिजे, असे स्पष्ट मत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी व्यक्त केले.

                शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये हिंदी विभाग व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी एम.ए. हिंदीमध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल दर्शन चौगले व हर्षिता माने या मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदाचे विभागीय प्रमुख प्रकाश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक विजय कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.

यावेळी राजभाषा अधिकारी पल्लवी कोहार आणि सुयोग पाटील यांनीही विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश निकम व सारिका कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. जयसिंग कांबळे यांनी मानले. यावेळी डॉ.संतोष कोळेकर तसेच संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

२९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत ५० हून अधिक देशांतील व्यावसायिक नेते येणार एकत्र

२९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत ५० हून अधिक देशांतील व्यावसायिक नेते येणा…