no images were found
जिल्हा कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचार मेळावा उत्साहात संपन्न : विकासकामांच्या शिदोरीवर महायुतीचा विजय निश्चित
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या विकासकामांच्या शिदोरीवर दोन्ही जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला .आज भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचार मेळावा उत्साहात संपन्न झाला. पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराची पुढील दिशा, बूथनिहाय नियोजन आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती, महायुतीचे सर्व घटक पक्ष एकदिलाने एकाच व्यासपीठावर आले. ही एकजूटच आमची खरी ताकद आहे.असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या मेळाव्यास कोल्हापूरचे पालकमंत्री . प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर सौ. रुपाराणी निकम, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष . समित कदम, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण आणि प्रताप (भैय्या) माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.