Home Uncategorized जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई, अनधिकृत साहित्य जप्त

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई, अनधिकृत साहित्य जप्त

1 second read
0
0
9

no images were found

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई, अनधिकृत साहित्य जप्त

कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट उपद्रव शोध पथक आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरातील फुटपाथवरील अनधिकृत फळविक्रेत्यांवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 1 हातगाडी, 50 कॅरेट, 8 फळांच्या थाळया व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून पुढील काळातही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यवसाय धारकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम दुषम पाटील, विभागीय कार्यालय क्रमांक 4 व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच उपद्रव शोध पथकाकडील जवान सहभागी झाले होते. 

अतिक्रमणधारकांना महापालिकेचा इशारा

शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारण्यात आलेले अनधिकृत शेड्स आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसाद : नवीन परवान्यासाठी १५ अर्ज दाखल ; २० परवान्यांचे नूतनीकरण

सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसाद : नवीन परवान्यासाठी १५ अर्ज दा…