no images were found
अखेर प्रदक्षिणा मार्ग खुला! हिंदू जनसंघर्ष समितीच्या लढ्याला यश!
कोल्हापूर:आई अंबाबाईच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्याने प्रदक्षिणा मार्गावरील बॅरिकेड्स प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत.या संपूर्ण लढ्यात पत्रकार बांधवांची मोलाची साथ, सहकार्य आणि विषयाला वाचा फोडण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे ठरले. सर्व पत्रकार बांधवांचे हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार! हा केवळ एका मागणीचा विजय नसून, भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा सन्मान आहे.
आई अंबाबाईच्या सेवेसाठी आपण यापुढेही सर्वांनी एकजुटीने कार्य करूया. मंदिराच्या हिताच्या, जतन-संवर्धनाच्या आणि भाविकांच्या श्रद्धेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही विपरीत गोष्टी घडल्यास, त्यांना निर्भीडपणे वाचा फोडूया आणि योग्य मार्गाने त्याविरोधात आवाज उठवूया.आई अंबाबाईने सर्वांना सद्बुद्धी द्यावी आणि तिच्या सेवेसाठी एकत्र येण्याची शक्ती द्यावी, हीच तिच्या चरणी प्रार्थना!