Home Uncategorized लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; 

लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; 

10 second read
0
0
4

no images were found

लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; 

कोल्हापूर,  : लोटस कार्स इंडियाच्या ‘ग्राहक संपर्क आणि ब्रँड एक्सपिरियन्स’ अभियानांतर्गत पुरस्कारविजेती इलेक्ट्रिक परफॉर्मन्स कार ‘लोटस इलेट्रे’ कोल्हापुरातील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी संभाव्य ग्राहक, उद्योजक, व्यावसायिक नेते, लक्झरी जीवनशैलीप्रेमी आणि वाहनप्रेमींसाठी विशेष ब्रँड अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        पश्चिम भारतातील बहुशहरी दौऱ्याचा हा महत्त्वाचा टप्पा असून, पुणे आणि साताऱ्यानंतर लोटसचा हा दौरा कोल्हापुरात दाखल झाला आहे. त्यानंतर हा दौरा गोव्याकडे मार्गक्रमण करणार आहे. यासोबतच दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांमध्येही ब्रँडचा ग्राहक संपर्क उपक्रम सुरू आहे.

      कोल्हापुरातील कार्यक्रमात लोटस इलेट्रे या ऑल-इलेक्ट्रिक हायपर-एसयूव्हीवर विशेष भर दिला जाणार आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स, प्रगत तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील उपयुक्तता यांचा मेळ साधणारी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लोटसच्या नव्या पर्वाचे प्रतिनिधित्व करते.

       या विशेष कार्यक्रमात आमंत्रित पाहुण्यांना ड्राइव्ह एक्सपिरियन्स, वाहनाचे वैयक्तिक सादरीकरण आणि ब्रँडविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. या उपक्रमातून कोल्हापुरातील संभाव्य ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासह ब्रिटिश परफॉर्मन्सचा वारसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अनुभव देण्याचा लोटसचा प्रयत्न आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवा…