Home Uncategorized आगामी पंधरा दिवसात अतिक्रमणे काढण्यात यावीत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

आगामी पंधरा दिवसात अतिक्रमणे काढण्यात यावीत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

13 second read
0
0
12

no images were found

आगामी पंधरा दिवसात अतिक्रमणे काढण्यात यावीत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 कोल्हापूर, : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी आगामी पंधरा दिवसात काढावीत.नाही काढल्यास त्या सर्वांना प्रशासनातर्फे कारणे दाखवा नोटिसा देणार, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दिला.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ते म्हणाले, रस्ते अपघातामुळे अनेकांवर मृत्यू ओढावू शकतो. याचे प्रमाण कमी करणे संपूर्णता मानवी हातात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक या कामाला प्राधान्य द्यावे .

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच केंद्र सरकारच्या सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने देशभरातील शंभर जिल्ह्यामध्ये ‘झिरो फॅटलिटी डिस्ट्रीक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे.

 या जिल्ह्यातून राष्ट्रीय,राज्य आणि प्रमुख महामार्ग जातात. पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात 52 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चिती करण्यात आली आहे. ही सर्व ब्लॅक स्पॉट ठिकाणे पंधरा दिवसात दुरुस्त करावीत.दुरुस्त झालेल्या ठिकाणी मी स्वतः पोलीस अधीक्षकांसमवेत भेट देणार असल्याचेही ते म्हणाले.तसेच जिल्हयातील सर्व महामार्गावरील खड्डे भरणे,रोड मार्किंग करणे,डिव्हायडर संदर्भात फलक लावणे,सिग्नल दुरुस्ती,चौकात पट्टे मारणे, झाडांच्या फांदया कट करणे,राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढणे, पावसामुळे उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, रोडच्या बाजूचे पोल शिफ्ट करणे त्याचबरोबर रोड लगतच्या साइड पट्टया भरुन घेणे आदी कामे संबंधित विभागाने वेळेत करावीत असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

 तर कागल येथील RTO चे चेकपोस्ट असलेल्या ठिकाणी नॅशनल हायवेने सिमेंट बॅरिगेट्स लावावीत अशी सूचना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली.

  राहवीर योजनेच्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशनमध्ये दर्शनी भागात या योजनेची माहिती फलकावर लावावी अशी सूचना अशासकीय सदस्य विनायक रेवणकर यांनी या बैठकीत केली 

  नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता महेश पाटोळे,गोविंद बैरवा दूरदृश्य प्रणालीद्वारे तर परिवहन अधिकारी संजीव भोर,इचलकरंजीचे RTO श्रीकृष्ण नकाते,PWDचे कार्य.अभियंता सी ए.आयरेकर,पो.नि रामदास जाधव,एपीआय राणी पाटील,महेश कंजार,संतोष रासने,पो.नि नंदकुमार मोरे यांच्यासह संबंधि

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…