Home Uncategorized शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

36 second read
0
0
7

no images were found

शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

थकबाकीपोटी रू.1 लाख 23 हजार 141 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल

कोल्हापूर  :-  महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी करण्यात येत आहे.

            याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील विक्रम नगर परिसरात मोठे थकबाकीदार नळ कनेक्शनधारक यांच्यावर कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 10 थकबाकी धारकांची कनेक्शन तोडण्यात येऊन थकबाकीपोटी रू.1 लाख 23 हजार 141 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आली आहे.

            सदरची कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने, अतिरीक्त आयुक्त शिल्पा दरेकर व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये शाखा अभियंता सुनिल भाईक, मीटर रीडर गणेश देसाई, पथक कर्मचारी अरूण प्रभावळे, बाबासाहेब पठाण, भूपाल कुंभार, संजय चौगुले, प्रवीण वरेकर, मुकुंद माने, प्रितेश रणवरे, महावीर आवळे व फिटर संभाजी रूईकर यांनी प्रमुख सहभाग घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

नदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा – भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव

नदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा R…