Home Uncategorized कुलगुरूंच्या भेटीने भारावले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे

कुलगुरूंच्या भेटीने भारावले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे

0 second read
0
0
16

no images were found

कुलगुरूंच्या भेटीने भारावले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांची सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. कुलगुरूंच्या या अचानक भेटीमुळे ९२ वर्षांचा हा साहित्यिक भारावून गेला.

कुलगुरु डॉ. रजनीश कामत यांनी नलगे यांची त्यांच्या कोतोली रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान डॉ. कामत आणि नलगे यांच्यात मनमोकळा संवाद झाला. कुलगुरू डॉ. कामत यांनी नलगे यांच्या साहित्यिक योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच अन्य जुन्या आठवणींविषयी बोलताना चंद्रकुमार नलगे यांना गहिवरुन आले. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपण इतक्या आस्थेने विचारपूस करण्यासाठी आलात, असे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी आपली काही निवडक पुस्तके कुलगुरूंना भेट दिली. यावेळी प्रदीप नलगे, अनिता नलगे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न १९ उद्योजकांचा …