Home Uncategorized परवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सील

परवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सील

32 second read
0
0
12

no images were found

परवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सील

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा व परवाना विभागाने गुरुवारी एलेक्झा पार्क, जुना पुणे-बेंगळुरू रोड येथील व्यावसायिक संकुलात थकीत घरफाळा व विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आलेल्या तीन व्यावसायिक आस्थापनांना सील करण्यात आले.

            महापालिकेने संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी नोटीस देऊन व्यवसाय परवाना घेण्याबाबत लेखी सूचना दिली होती. मात्र, त्यानंतरही परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने ही कारवाई केली. सील करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये लॅकमे सलून, बेरीज फायनान्स कंपनी आणि इमिरेटस परफ्यूम यांचा समावेश आहे.

            ही कारवाई सहा.आयुक्त डॉ. विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कर अधीक्षक श्रीमती अर्चना प्रभावळे तसेच घरफाळा व परवाना विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

            यावेळी महानगरपालिकेने शहरातील सर्व व्यावसायिकांना व्यवसाय परवाना, थकीत घरफाळा तसेच भाडेकरू वापराच्या मिळकतींसाठी भाडेकराराची प्रत घरफाळा विभागाकडे सादर करून आवश्यक कर आकारणी व व्यवसाय परवाना तातडीने प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या किंवा नियमांचे पालन न करणाऱ्या मिळकतींवर महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन

व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिप…