Home Uncategorized कोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वल

कोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वल

41 second read
0
0
8

no images were found

कोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वल

इयत्ता पाचवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत 112 विद्यार्थी चमकले

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महानगरपालिका शाळांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महानगरपालिका शाळेतील 25 मुले राज्य गुणवत्ता यादीत तर 87 मुले जिल्हा गुणवत्ता यादीत चमकून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे.

            यामध्ये लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील राज्य राज्य गुणवत्तेत 15 जिल्हा गुणवत्तेत 42, नेहरूनगर विद्यामंदिरमधील राज्य गुणवत्तेत 5 जिल्हा गुणवत्तेत 10, प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी राज्य गुणवत्तेत 2 जिल्हा गुणवत्तेत 11, टेंबलाईवाडी विद्यामंदिरमधील राज्य गुणवत्तेत 2 जिल्हा गुणवत्तेत 9, पीएम श्री.महात्मा फुले विद्यालयमधील जिल्हा गुणवत्तेत 9, राजर्षी शाहू विद्यालय बावडामधील राज्य गुणवत्तेत 1, ज्योतिर्लिंग विद्यामंदिरमधील जिल्हा गुणवत्तेत 3 व रावबहाद्दुर विचारे विद्यालयमधील जिल्हा गुणवत्तेत 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

            महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने इयत्ता पहिलीपासूनच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी पहिली व दुसरीसाठी ‘कोल्हापूर टॅलेंट सर्च’, तिसरी व सहावीसाठी ‘प्रज्ञाशोध परीक्षा’, तर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कॉलरशिप सराव परीक्षा’ नियमितपणे घेतल्या जातात. महापालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी स्कॉलरशिप 2 सराव परीक्षा आणि 1 अंतिम स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा निकाल पण तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक लावत अवघ्या एक तासात निकाल पालकांच्या मोबाईल वर पाठवण्यात येतो. या विशेष प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.

            विशेष म्हणजे, अंतिम परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासना इतकीच शिष्यवृत्ती महानगरपालिकेकडूनही दिली जाते. अशी शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. याशिवाय, चौथी  स्कॉलरशिप परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या भाग्यवान विद्यार्थ्यांना थेट विमानाने ‘इस्रो’ (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जाते आणि या संपूर्ण दौऱ्याचा खर्च महानगरपालिका स्वतः करते. या ऐतिहासिक यशाबद्दल महापौर सौ.रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी सौ.जयश्री जाधव यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला व नियोनाला दिले जात आहे.

            यासाठी प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, परीक्षा विभागाकडील संजय शिंदे, सर्व अधिकारी व कार्यालयीन स्टाफ प्राथमिक शिक्षण समिती यांचे योगदान लाभले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आर्थिकदृष्ट्या सबलांना नव्हे !  गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ !!

आर्थिकदृष्ट्या सबलांना नव्हे !  गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ !!    पुण्यश्ल…